२०१९ च्या तुलनेत अनेक मतदारसंघांमध्ये मतांची टक्केवारी मोठ्या प्रमाणात वाढण्याची कारणे व त्या वाढीव मतटक्क्यांचा फायदा नेमका कोणाला होणार, याची चर्चा आता सुरू झाली आहे. वाढीव मतदान सत्तारुढ महायुतीला फटका देईल की, महाविकास आघाडीला याबद्दल वेगवेगळे तर्क दिले जात आहेत. सरकारच्या विरोधात लाट होती, त्याचा • फटका महायुतीला बसेल, असे मविआच्या त्यांचे म्हणणे आहे. तर, एक्झिट पोलचे आकडे काहीही येऊ द्या, जिंकणार आम्हीच असे महायुतीचे नेते सांगत आहेत. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले की, महायुती सरकारने घेतलेल्या निर्णयांचा निश्चितपणे आम्हालाच फायदा झालेला आहे. निकालात तो प्रतिबिंबित होईल. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले की, सरकारविरोधात लाट असली तरच मतदान मोठ्या प्रमाणात वाढते, यावेळी तेच झाले असून निकालात दिसेल.